नेत्रदान…. एक डोळस चळवळ…

या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही पण आपल्या देशातील प्रती १५० लोकांमध्ये एक जण हा अंध आहे ही आजची भयानक वास्तव दर्शवणारी परिस्थिती आहे आणि या पिडीत लोकांमध्ये लहान मुलांची व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांची संख्या अधिक आहे.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ऑफथेमॉंलॉजी च्या डॉक्टर आदित्य केळकर यांच्या म्हणण्यानुसार “कोरोनल ट्रान्सप्लांट” सर्जरी झाल्यास अशा पेशंट्स ना जगाकडे पाहायची एक नवी दृष्टी तर मिळेलच पण त्याचसोबत आजारापासून त्यांना बऱ्याच अंशी दिलासा ही मिळेल. नेत्रदानाची चळवळ जरी दिवसागणिक वाढत असली तरी “दाते व पिडीत” यांच्यातील दरी अजूनही मोठी आहे. मागील वर्षीच्या मृत्यू दरावर जर एक नजर टाकली तर आपल्या देशातील १० लाख मृत्यू पडलेल्या लोकांपैकी फक्त ४२,००० लोकांनीच नेत्रदानासाठी पुढे येत फॉर्म भरल्याचे कळते. त्यामुळे नेत्रदानासारख्या चळवळीला खरी बळकटी द्यायची असेल तर जनजागृतीसोबत कायद्याच्या माध्यमातून लोकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करणं ही गरजेचं आहे.

डॉक्टर आदित्य केळकर नेत्रदान करणं किती सोप्पं आहे या व यासारख्या नेत्रदानाविषयीच्या महत्वाच्या बाबींवर या ब्लॉग च्या निमित्ताने प्रकाश टाकू पाहतायत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेत्रदान करण्यासाठी वयाचा कुठलाही अडसर नाही फक्त १८ वर्ष वयाखालील मुलांना जर नेत्रदानासाठीचा फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी असणे आवश्यक असते. तसेच जरी कोणाची दृष्टी कमी असली तरी अशा व्यक्ती ही नेत्रदानासाठी पात्र असतात. सर्व धर्मीयांमध्ये नेत्रदानाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे.

नेत्रदानाचे काम मृत्यूनंतर होत असले तरी सदर मृत व्यक्तीच्या नातलगांसाठी हा बऱ्याचअंशी भावनिक व पूर्वग्रह दूषित असलेला मुद्दा ठरतो. मात्र डॉक्टर केळकर यांच्या म्हणण्यानुसार नेत्रदानामुळे ना इजा होते ना अंत्यविधीच्या दरम्यान कुठले अडथळे येतात.
या उलट कोणी नेत्रदानासाठी फॉर्म भरला असेल आणि त्याचा किंवा तिचा मृत्यू झाला तर नातेवाईकांनी मृत्यू पश्चात लगेच सदर व्यक्तीचे डोळे बंद करून पंखा बंद करून शक्य असल्यास एसी चालू करावा व ओल्या कापसाच्या पट्या डोळ्यावर ठेवाव्यात. यानंतर लवकरात लवकर डॉक्टर शी संपर्क साधावा कारण मृत्यूनंतर पुढील ३ ते ४ तासात नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते.

आज अंधारात जगणाऱ्या हजारो लोकांना डोळस लोकांनी केलेल्या नेत्रदानामुळे प्रकाश मिळू शकतो. मुंबई आणि नागपूर पाठोपाठ आता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ही मेडिकल सर्टिफिकेट मध्ये नेत्रदानाचा रकाना समाविष्ट केलेला आहे. यामुळे नेत्रदानासारख्या डोळस चळवळीला यानिमित्ताने मोठी ऊर्जा मिळेल यात काही शंका नाही. नेत्र दानाविषयी किंवा यासंबंधित आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास पुण्याच्या निओ सुपर स्पेशालिटी आय क्लिनिक मध्ये तुम्ही कधीही संपर्क साधू शकता. आमच्या येथील तज्ञ डॉकटर आपल्या सर्व शंकांचं निरसन करतील.
अधिक माहितीसाठी ०२० ४९०१४९०१ या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा niohospital@gmail.com या वर मेल करा.

डॉ. जय केळकर
डॉ. योगेश चौगुले

डोळ्यांबाबतीत तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही कुठलाही त्रास जाणवला तर पुण्यातील औंध येथील आमच्या निओ आय क्लिनीकशी संपर्क साधून तुम्ही मिळवू शकता तज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला… मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असो , ग्लुकोमासारखा आजार असो , लहान मुलांच्या डोळ्यांच्या काळजी संबंधित शंका असो किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि कमी झालेल्या दृष्टीसंदर्भातील गंभीर प्रश्न असो अशावेळी लवकर व योग्य निदान होण्यासाठी तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा…
खालील फॉर्म भरून तुम्ही आमच्याशी त्वरित संपर्क करू शकता.

Name *

Email *

Mobile No *

Enter Captcha
captcha