ग्लॅकोमा शी दोन हात करताना….

Glaucoma Blog Image
रातांधळेपणा , अंधूक दिसत असल्याची तक्रार , चष्म्याचे सतत बदलणारे नंबर , दूरवरचे दिसण्यात येणाऱ्या अडचणी यासारखी लक्षणं दिसत असल्यास आपणास ग्लॅकोमा आजाराचा धोका संभवतो त्यामुळे वेळीच तज्ञ डॉक्टर शी संपर्क साधलेले कधीही चांगले… याच आजाराविषयी थोडक्यात..

ग्लॅकोमा हा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजार असून या आजारामुळे दृष्टी गमावण्याची भिती ही कायम असते. उदाहरणादाखल भारतात जर ५० पेशंट्स ग्लॅकोमा ने पिडीत असतील असा आकडा पकडला तर ५० पैकी १ जण आपली दृष्टी या आजारामुळे गमवतो असे निदर्शनास आले आहे. तसेच हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येण्यापूर्वीच दृष्टी जाणाऱ्या पेशंटचे प्रमाण ७:१ असे आहे. म्हणजे ७ पैकी १ ग्लॅकोमा चा पेशंट असा असतो की जो उपचारांसाठी हॉस्पिटल मध्ये येण्याआधीच दृष्टी गमावून बसलेला असतो. जागरूकता आणि काळजीपूर्वक झालेले निदान यामुळे ग्लॅकोमास्तव येणारे अंधत्व टाळता येऊ शकते.

ग्लॅकोमा म्हणजे नक्की काय?

योग्य जीवनसत्वांअभावी डोळ्यातील ऑप्टिक नर्व्ह ला इजा पोचून ग्लॅकोमा आजाराला आमंत्रण मिळते. डोळ्यातील पाण्याचे बाहेर जाणे व आत येणे या चक्राचा समतोल बिघडल्याने दबाव वाढून ऑप्टिक नर्व्हला इजा पोचण्याची भीती असते.
सामान्यतः हीच ऑप्टिक नर्व्ह मेंदूला संदेश देऊन आपल्याला स्पष्ट दृष्टी मिळवून देत असते. या नर्व्ह ला इजा पोचल्याने आजूबाजूच्या गोष्टी दिसण्यात अनेक अडथळे येऊ शकतात. या छोट्या मोठ्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास याची परिणीती दृष्टी गमावण्यात होऊ शकते.
मोतीबिंदूच्या उलट या प्रकारात एकदा गमावलेली दृष्टी परत मिळवता येत नाही असे असले तरी योग्य व वेळेत केलेले उपचार या आजारापासून आपल्याला कायमचे दूर ठेऊ शकतात. जुन्या पिढीत जर कुटुंबात हा त्रास असेल तर चाळीशी ओलांडल्यानंतर पुढील पिढीतील प्रत्येकाने योग्य काळजी घेत यासंबंधी नियमित चेकअप केले पाहिजे.

ग्लॅकोमा ची ही लक्षणे नजरेआड करू नका….

  • १) पूर्वीच्या पिढीत कोणाला कुटुंबात हा त्रास होता का याची माहिती घ्या.
  • २) अधूनमधून अंधुक दिसणे
  • ३)दूरवरचे दिसण्यात अडचणी
  • ४) रात्री आजूबाजूच्या गोष्टी दिसण्यात अडचणी
  • ५) चष्म्याचे नंबर सतत बदलते राहणं

ग्लॅकोमा आजाराचे एकूण चार प्रकार आहेत.

१) ओपन अँगल ग्लॅकोमा 
अतिशय धोकादायक प्रकारात मोडणारा ग्लॅकोमा चा हा प्रकार आहे. यात ऑप्टिक नर्व्ह वर वाढणारा दबाव हा हळूहळू वाढतो आणि जो सहज लक्षात येत नाही. तज्ञ डॉक्टरांकडून नियमित चेकअप करून घेणे हा या प्रकारावरील आजारावर एकमेव उपाय आहे.

१) ओपन अँगल ग्लॅकोमा
ग्लॅकोमा च्या या प्रकारात ऑप्टिक नर्व्ह वर अचानकपणे दबाव वाढतो. अंधुक दृष्टी , तीव्र वेदना , दिव्याच्या आजूबाजूला इंद्रधनुष्याच्या सात रंगांचे दिसणे , उलट्या व मळमळणे ही लक्षणे या प्रकारात दिसून येतात.

१) ओपन अँगल ग्लॅकोमा
जन्मतः ड्रेनिंग चॅनेल मधेच दोष असल्यास ह्या प्रकारचा आजार बळावू शकतो. ऑप्टिक नर्व्ह वरील दाब वाढल्यास मुलांच्या डोळ्यांचा आकारही मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराने त्रस्त मुलांच्या डोळ्यात निळी झालर पाहायला मिळते.

१) ओपन अँगल ग्लॅकोमा
मोठ्या इजा , स्टीरॉइड सारखे ड्रगचे सेवन केल्यामुळे ह्या प्रकारचा ग्लॅकोमा आजार मूळ धरू शकतो. ज्यामुळे आऊटफ्लो चॅनल बंद होण्याची भीती असते व अखेर यामुळेच ऑप्टिक नर्व्ह वर प्रेशर वाढल्याचे समजते.

ग्लॅकोमा असल्याचे कसे समजते व त्याचे निदान कसे होते ?

लवकरात लवकर झालेले निदान हे कधीही चांगले… साधारणतः चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये व पूर्वजांचा ग्लॅकोमाचा इतिहास असलेल्याना  हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे . म्हणूनच अशा लोकांनी नियमित चाचण्या करून घ्यायला हव्या. ओपन अँगल ग्लॅकोमा ह्या प्रकारचा आजार प्रकर्षाने जाणवतो त्यामुळे लवकरात लवकर निदान करून घेणं हाच या आजारापासून वाचण्याचा पर्याय आहे.

निदान झाल्यावर ग्लॅकोमा या आजारावर साधारण काय उपाय असतात?

निदान झाल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्यामुळे आजारावर मात करता येऊ शकते. औषधे , लेझर सर्जरी यांचा ही पर्याय डॉक्टरांपुढे असू शकतो. यामध्ये आय ड्रॉप्स ने ही आराम मिळू शकतो. औषधांमुळे ड्रेनिंग चॅनेल पुन्हा कार्यान्वित होतात. किंवा लेसर ट्रीटमेंट केल्यास कृत्रिम चॅनेल ची निर्मिती शक्य होते.
आजार बरा करण्यापेक्षा तो होण्याआधीच योग्य निदान करून मुळासकट संपवायचा असेल तर नियमित चेकअप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जर चाळीशी ओलांडली असेल आणि तुम्हाला जर वरीलपैकी कुठलाही त्रास होत असेल तर निओ सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटल मध्ये नक्की संपर्क साधा .

–डॉ पंकज बेंडाळे
(M.B.B.S , MS (Ophth))

डोळ्यांबाबतीत तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही कुठलाही त्रास जाणवला तर पुण्यातील औंध येथील आमच्या निओ आय क्लिनीकशी संपर्क साधून तुम्ही मिळवू शकता तज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला… मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असो , ग्लुकोमासारखा आजार असो , लहान मुलांच्या डोळ्यांच्या काळजी संबंधित शंका असो किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि कमी झालेल्या दृष्टीसंदर्भातील गंभीर प्रश्न असो अशावेळी लवकर व योग्य निदान होण्यासाठी तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा…
खालील फॉर्म भरून तुम्ही आमच्याशी त्वरित संपर्क करू शकता.

Name *

Email *

Mobile No *

Enter Captcha
captcha