मोतीबिंदू विषयी थोडंसं….  डॉकटरच्या नजरेतून…

Cataract Blog Image
धूसर दिसू लागणे, दूरवरून व्यक्तींचे चेहरे ओळखता न येणं , रात्रीच्या अंधारात नीटसं न दिसणं या आणि यासारख्या असंख्य अडचणींना तुम्ही किंवा तुमच्या जवळचं कोणी सामोरे जात असेल तर तुम्ही खालील मोतीबिंदूविषयीची माहिती वाचायलाच हवी….

मोतीबिंदू अर्थात कॅटरॅकट म्हणजे डोळ्यातील लेन्सवरचा असा पातळ पडदा जो सामान्यतः स्वच्छ असायला हवा. मात्र जेंव्हा या पडद्यावर धूसर आवरण तयार होऊन डोळ्यांमार्फत दिसायला अडचणी येतात तेव्हा मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉकटरांच्या सल्याने करून घ्यायला हवी. एकाच वेळी एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये ही समस्या उद्भवू शकते. जनुकीय संक्रमण (heredity) , यापूर्वी डोळ्याला झालेली दुखापत यामुळे मोतीबिंदू चा धोका अधिक संभवतो मात्र वयोमानानुसार मोतीबिंदूची समस्या उदभवणं ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. म्हणूनच चाळीशी ओलांडलेल्या लोकांना याचा धोका अधिक असतो.

मोतीबिंदू म्हणजे नक्की काय?

आपल्याला जग उघड्या डोळ्यांनी पाहता यावं म्हणून डोळ्यातील लेन्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. मात्र जसे जसे वय वाढते त्याप्रमाणे लेन्स मधील क्षमता हळू हळू कमी होऊ लागते आणि त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी दिसत नसल्याच्या तक्रारी ही वयासोबत वाढू लागतात. कालांतराने लेन्सचा हा पडदा धुरकट होऊन माणसाच्या दिसण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला दिसून येतो.

या आजाराची लक्षणं खालीलप्रमाणे-

  • १) डोळ्यांची आग न होता धूसर दिसू लागणे.
  • २) प्रकाशाप्रती असलेली डोळ्यांची संवेदनशीलता होऊन दिसायला अडचणी येणे.
  • ३) एकाच डोळ्यातून दोन दोन दिसणे यासारख्या समस्या यामुळे उद्भवू शकतात ज्यामुळे गाडी चालवण्यासारख्या रोजच्या कामांमध्ये अडचणी येतात.
  • ४) रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या गोष्टी दिसण्यात अडचणी येतात.
  • ५) रंगांमधील फरक ओळखण्यात अडचणी जाणवू लागतात.
  • ६) लांब अंतरावरून चेहरे ओळखताना अडचणी येतात.

शस्त्रक्रियेसंदर्भात खालील पर्याय आज उपलब्ध आहेत.

मोतीबिंदूचा त्रास सुरु झाला म्हणजे कायमचं अंधत्व येतं ही एक चुकीची समजूत आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही सुरक्षित व खात्रीशीर आहे व पुणे येथील आमच्या निओ मल्टिस्पेशॅलिटी आय हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत अशा शस्त्रक्रिया सहजपणे केल्या जातात ज्यात जुनी लेन्स काढून नवी कृत्रिम लेन्स बसवण्याचं काम केलं जातं.

शस्त्रक्रियांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

तुम्ही मोतीबिंदूची कल्पना येऊनही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिलात तर हे होऊ शकतं …
काळापरत्वे हा आजार अधिक बळावून दिवसागणिक माणसाच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि सरते शेवटी डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह ला दुखापत होऊ शकते.

खालील दोन प्रकारे शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात.
१) मायक्रो फँक्यूमुलसिफीकेशन (MICS)
२) फेमटो असिस्टेड कॅटरॅकट सर्जरी (FLACS)

तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीत मोतीबिंदू शी संबंधित कुठलीही लक्षणे आढळून आल्यास त्वरित आमच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधा कारण निओ सुपर स्पेशालिटी क्लिनिक मध्ये आम्ही रुग्णांना देतो अत्याधुनिक मेडिकल सुविधा आणि घेतो त्यांची काळजी.. निओ मल्टिस्पेशालिटी आय हॉस्पिटल पुण्यातील एक नामांकित हॉस्पिटल असून अतिशय काळजीपूर्वक व नेमकेपणाने येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जाते. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

— डॉ. जय केळकर
(D.N.B.,DOMS,FCPS)

डोळ्यांबाबतीत तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही कुठलाही त्रास जाणवला तर पुण्यातील औंध येथील आमच्या निओ आय क्लिनीकशी संपर्क साधून तुम्ही मिळवू शकता तज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला… मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असो , ग्लुकोमासारखा आजार असो , लहान मुलांच्या डोळ्यांच्या काळजी संबंधित शंका असो किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि कमी झालेल्या दृष्टीसंदर्भातील गंभीर प्रश्न असो अशावेळी लवकर व योग्य निदान होण्यासाठी तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा…
खालील फॉर्म भरून तुम्ही आमच्याशी त्वरित संपर्क करू शकता.

Name *

Email *

Mobile No *

Enter Captcha
captcha