Modern Day Vitreoretinal Surgery
What is retina?
Retina is a very delicate film at the back of the eye. The image is formed here and then transmitted to brain via the optic nerve. The vitreous jelly lies just in front of the retina.
What are the types of retina surgeries?
Retina surgeries mainly are of two types, Vitrectomy and Scleral buckle.
Scleral Buckle is the procedure carried out in select cases of retinal detachment in which a silicon band is fixed under the eye muscles on the white of the eye
Vitrectomy is a surgical procedure in which we remove the jelly (vitreous) of the eye for treatment of various retinal conditions. Vitrectomy is preferred for various retinal anomalies such as vitreous hemorrhage, retinal detachment, Epiretinal membrane, macular hole etc.
Is the surgery sutrureless?
Scleral buckling needs suturing whereas in vitrectomy we use 23/25-gauge system to ensure that wound size is small & most of the times surgery can be performed without sutures.
Along with vitrectomy additional procedures/ surgery are often needed?
- Sometimes, due to complex nature of retinal condition, there can be variation in the surgical procedure or a combination of various procedures maybe done. After removing the jelly (vitreous) surgeon may perform additional procedure(s) such as scleral buckling, membrane peeling, and laser/cryo, inject gas/ oil or perform cataract removal.
- In case silicon oil is used, a silicon oil removal surgery is performed after 3-6 months of first surgery depending on condition of retina.
What about the vision improvement do all patients see well?
- Visual recovery is an often-slow process. Although Anatomical success in modern day retinal surgeries has improved, the visual outcome depends on various factors other than just anatomical results & it may not be possible to predict beforehand.
Do we need to repeat retina surgery?
- If the existing retinal problem is not resolved after first surgery, re-surgery might be needed.
- Sometimes, the retinal problems can reoccur. Such as, retinal detachment or bleeding etc. at such times the surgery needs to be repeated.
- After use of silicon oil in the first surgery, a silicon oil removal surgery is performed at a later date.
What are the Newer advances in retinal surgery?
- Additional technology such as intraoperative OCT is useful to scan the retina during surgery to allow experts to see condition of retina on table.
- The digital 3D Artevo microscope enhances the retinal view digitally to enable surgeon to perform complex procedures.
What are the complications of retinal surgery?
Recurrence of retinal detachment, bleeding, infection, eye may shrink and turn white (Phthisis), cataract, glaucoma, floaters, glare, haloes, watering, itching, light sensitivity, thick glasses may be needed, loss of vision, loss of eye.
अत्याधुनिक नेत्रपटलाची शस्त्रक्रिया त्याबद्दल थोडेसे
नेत्रपटल म्हणजे डोळ्याच्या मागिल भागात असलेला एक पातळ पडदा त्यावर चित्र तयार होऊन ते ऑप्टिक नर्व्ह द्वारे मेंदुपर्यन्त पोहचते
नेत्रपटलाच्या शस्त्रक्रियेचे प्रकार कोणते?
स्क्लेरल बकल्:- या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागावर स्नायूंच्या खाली एक सिलिकॉन पदार्थचा पट्टा बसवला जातो. हि शस्त्रक्रिया काही ठराविक प्रकारे नेत्रपटल सरकले असेल तर करतात.
व्हिट्रेक्टॉमी:- या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यातील व्हिट्रियस नावाची जेली काढली जाते हि शस्त्रक्रिया नेत्रपटलाच्या विविध प्रकारच्या आजारासाठी केली जाते. उदा. नेत्रपटलाच्या मध्यभागी छिद्र असणे, पडद्यावर खपली, व्हिट्रियस जेलीमधील रक्तस्राव, नेत्रपटल सरकणे ई.
नेत्रपटलाची शस्त्रक्रिया बिनटाक्याची असते का?
स्क्लेरल बकल शस्त्रक्रिया मध्ये टाके घ्यावे लागतात परंतु व्हिट्रेक्टॉमी शस्त्रक्रिया मध्ये आम्ही आजकाल २३/२५ गॉज पद्धतीने शस्त्रक्रिया करतो त्यात बहुतेक वेळेला टाके घालावे लागत नाही.
नेत्र पटलाच्या शस्त्रक्रियांमध्ये वरील सांगितल्यापेक्षा अधिक काही शस्त्रक्रिया करावी लागते का?
नेत्रपटलाची स्थिती जशी असेल त्यावर अवंलबून काही वेळा स्केलर बकल व्हिट्रेक्टॉमी एकत्र केली जाते किंवा नेत्रपटलावरील खपली काढणे लेझर किंवा क्रायोथेरपी तसेच मोतीबिंदू शस्त्रकिया कधी-कधी एकत्र केली जाते. सिलिकॉन ऑइल चा वापर कधीकाळी पडदा चिटकवण्यासाठी करता येतो, असे असल्यास ३-६ महिन्यांनी ते शस्त्रक्रिया करून काढावे लागते.
सर्व रूग्णांना दृष्टी पुनः प्राप्त होते का?
शस्त्रक्रिये नंतर नजर सुधारण्यास बराच वेळ लागतो. आजकालच्या नेत्रपटलाच्या शस्त्रक्रियाचे तंत्रज्ञान सुधारले असल्याने नेत्रपटल चा दोष दुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे,तरी सुद्धा नजरेतील सुधारणा बाकी बऱ्याच गोष्टी वर अवलंबून असते. त्यामुळे त्याबद्दल आधीच सांगता येणे शक्य नसते.
नेत्रपटलची शस्त्रक्रिया पुन्हा -पुन्हा करावी लागते का?
नेत्रपटलाचा दोष एका शस्त्रक्रिये मध्ये बरा झाला नाही तर शस्त्रक्रिया पुन्हा करावी लागते, कधी कधी नेत्रपटलावर दोष पुन्हा उदभवू शकतो. (उदा. पडदा सरकाणे, रक्तस्राव होणे ई.) अशावेळेस पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सिलिकॉन ऑईल चा वापर केला असल्यास ते काढण्यासाठी सुध्दा पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
नवीन तंत्रज्ञानाबद्दल:-
INTRAOP OCT - शस्त्रक्रिये दरम्यान पडद्याचा स्कॅन करता येतो त्यामुळे शस्त्रक्रिया करताना नेत्रपटलाची स्तिथी तज्ञ पाहू शकतात.
DIGITAL 3D Artevo 800 - यामध्ये एका डिजिटल माइक्रोस्कोप चा वापर होतो त्यामुळे नेत्रपटलाची प्रतिमा शस्त्रक्रिये दरम्यान नेत्रतज्ञ मोठ्या टी. व्ही. वर पाहू शकतात.
शस्त्रक्रिये पासून होणारे धोके काय आहेत?
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे पूर्णतः नजर जाण्याचा धोका फार कमी आहे, तरी काही धोके शस्त्रक्रियेनंतर संभवू शकतात प्रकाशाचा /दिव्यांचा त्रास होणे दिव्या भोवती वलये दिसणे, रंग निराळे दिसणे , डोळ्यासमोर ठिपके दिसणे, चष्मा लागणे , भिंगाच्या मागचे टरफल पांढरे पडणे , डोळ्यातून पाणी येणे, खाज येणे , डोळे कोरडे पडणे , डोळे दुखणे , जंतू संसर्ग , नेत्र पटल ( पडदा ) सरकणे , बुबुळ खराब होणे, काचबिंदू होणे, डोळा छोटा / पांढरा होणे , नजर जाणे ई.